तेरणा फार्मसीच्या विद्यार्थ्यांची गिब्स व विमटा लॅब्समध्ये निवड
- Get link
- X
- Other Apps
तेरणा फार्मसीच्या विद्यार्थ्यांची गिब्स व विमटा लॅब्समध्ये निवड
धाराशिव दि.१४ (प्रतिनिधी) - तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील फार्मसी विभाग कार्यरत असल्यामुळे औषध निर्मिती संलग्नित आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये फार्मसी विभागाच्या पहिल्याच बॅचच्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
यावेळी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, औषध निर्माण क्षेत्रातील नामांकित जागतिक स्तरावरील कंपन्या रिलायन्स फार्मा, वखाड लिमिटेड, वखाड बायोटेक, श्रेया लाईफ सायन्सेस,
टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टीसीएस), गिब्स, विमटा लॅब्स या सारख्या आयटी
कंपन्यांमध्ये फार्मसी विभागातील ७० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तर दिवसेंदिवस पॅकेज व निवड संख्यात वाढ होत आहे. तसेच टीसीएस सारख्या नामांकित कंपनीमध्ये चालू वर्षासाठी निवडीचे प्रयत्न चालू आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या वाटचालीचा विचार करून क्षेत्रातील अभियांत्रिकी व फार्मसीसाठी जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध करून नोकरी मिळवून देण्यासाठी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय हे प्रथम कॉलेज ठरले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डाटा सायन्स ही शाखा असल्याने व या शाखेचे एप्लीकेशन औषधशास्त्र निर्मितीमध्ये दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे इंडस्ट्रियल तज्ञांच्या मदतीने फार्मसीच्या विद्यार्थ्यांनाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स या क्षेत्रामध्ये भविष्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सर्वोच्च पॅकेजवर नोकरी मिळू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या आठवड्यात झालेल्या आयटी कंपनी गिब्स व क्लीनिकल ट्रायल्सची विमटा लॅब्स या कंपनीमध्ये अनुक्रमे विशाल आव्हाड, सानप धीरज, विशाल टेकाळे व पवन माने यांची निवड झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची तेरणा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.पद्मसिंह पाटील विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त मल्हार पाटील, संस्थेचे सर्व विश्वस्त, व्यवस्थापकीय समन्वयक गणेश भातलवंडे, प्राचार्य डॉ. माने, डॉ. गणेश मते व सर्व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी टीपीओ अशोक जगताप व विभागीय टीपीओ डॉ. गुरुप्रसाद चिवटे यांनी विशेष प्रयत्न केले.
- Get link
- X
- Other Apps