सुराज्य मानवता संघाची बैठक पडली पार

सुराज्य मानवता संघाची बैठक पडली पार


तुळजापूर दि.२१ (प्रतिनिधी) - सुराज्य मानवता संघ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक तुळजापूर येथे दि.२० ऑक्टोबर रोजी पार पडली. दरम्यान, कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन, महंत मावजीनाथ महाराज यांच्या मठास भेट देऊन निसर्गपूजक प्रार्थना व एकत्र संघटीत काम करण्यासाठी आवश्यक संकल्प करण्यात आला. 

सुराज्य मानवता संघ या संघटनेचा माध्यमातून शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार व जनसामान्यांच्या हितासाठी न्याय हक्क मिळवून देणे व इतर कायदेशीर बाबींचा पाठपुरावा करून त्यांना न्याय देण्याचा संकल्प करून पुढील वाटचाल निश्चित करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. सर्वसामान्य कुटुंबातील मुले व मुलींचे शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वर्षाच्या आता रोजगार निर्मितीसाठी त्वरित किमान १ लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. तसेच सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, शेत मजुरांच्या समस्यांबाबतही चर्चा करण्यात आली. यावेळी सुराज्य मानवता संघाचे संस्थापक अध्यक्ष सुरेंद्र काकडे, ऍड. दीपक वसावे, शहाजी सोमवंशी, पूजाताई चव्हाण, किशोर सागावकर, महंत बबन गिरी महाराज आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !