नवरात्र महोत्सवाच्या अध्यक्षपदी गरड तर उपाध्यक्षपदी कोळी
नवरात्र महोत्सवाच्या अध्यक्षपदी गरड तर उपाध्यक्षपदी कोळी
लोहारा दि.७ (प्रतिनिधी) - येथील श्री जगदंबा मंदिर ट्रस्टच्या नवरात्र महोत्सवच्या अध्यक्षपदी दिनेश गरड यांची तर उपाध्यक्षपदी सचिन कोळी व कार्यक्रम प्रमुख म्हणून प्राचार्य शहाजी जाधव यांची निवड करण्यात आली.
श्री जगदंबा मंदिर ट्रस्टचे जेष्ठ सदस्य दिलीप फुंदीपले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संजय दरेकर, प्राचार्य शहाजी जाधव, व्यकंट पोतदार आदी उपस्थित होते. ९ दिवस चालणाऱ्या नवरात्र महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ट्रस्टचे सदस्य हनुमंत गरड, शिवराज झिंगाडे, विजय जाधव, सतिश गिरी, शिवा थोरात, योगेश बाभळे, प्रशांत माळवदकर, संतोष फावडे, बाळू सातपुते, बालाजी कदम, महेश शेवाळे, लहू नारायनकर, गौरव गोसावी, विशाल रोडगे, शशिकांत माळी पिलू माळी, बबलू नारायनकर, प्रतिक गोसावी, चंदन भारती, अजय गोसावी आदी उपस्थित होते.