उपमुख्यमंत्री फडणवीस व आ पवार यांचा वडार समाजाच्यावतीने सत्कार होणार
उपमुख्यमंत्री फडणवीस व आ पवार यांचा वडार समाजाच्यावतीने सत्कार होणार
धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - वडार समाजासाठी कै.पै. मारूती चव्हाण (वडार ) अर्थिक विकास मंहामंडळ स्थापन करून त्या मंडळास प्रारुप स्वरूपात ५० कोटी रुपयांची तरतुद केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ अभिमन्यु पवार यांचा सत्कार करण्याचा ठराव घेण्यात आला.
धाराशिव येथे वडार समाजाची बैठक घेण्यात आली. यावेळी नितीन वाघमारे, पिराजी मंजुळे, रवि शिंदे, अर्जुन धोत्रे, किसन रायपंवाड, मारुती गोराठकर, साहेबराव बेळे, श्रीकांत देवकर, दत्तात्रय शिंदे, बाबुराव धोत्रे, शंकर फुलारे, विजय मुद्दे, बालाजी शिंगे, दुर्गा पवार, बाबा धोत्रे, बालाजी दंडगोल, अशोक दंडगोल, लक्ष्मण माने, मधुकर बंधपत्ते, मनोज पवार, साईनाथ मेटकर, बाबुराव फुलवरे, शंकर चौगुले, चंद्रकांत माने, अण्णा दाते यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस व आ पवार यांच्या सत्काराचा ठराव एक मताने घेण्यात आला.