भूम ग्रामीण रूग्णालयात आक्सिजनचा पर्याप्त पुरवठा


भूम ग्रामीण रूग्णालयात आक्सिजनचा पर्याप्त पुरवठा


 धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) - भूम ग्रामीण रूग्णालयात एका १४ महिन्यांच्या बालकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारित झाले. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी रूग्णालयाला भेट दिली. तर मृतक बालकाच्या नातेवाईकांच्या त्यांच्या गावी जावून भेट घेवून विचारपूस केली. ग्रामीण रूग्णालय भूम येथे १५० एलपीएमचा  प्राणवायू निर्मिती प्रकल्प आहे. तसेच ड्यूरा प्राणवायू प्रकल्प व मध्यवर्ती प्राणवायू लाईन असल्यामुळे प्राणवायूचा पुरवठा पर्याप्त असल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.

   त्या बालकाने घरीच मान टाकल्यामुळे अत्यवस्थ स्थितीमध्ये खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. रूग्णाची नाडी लागत नसल्यामुळे व परिस्थिती गंभीर असल्याने त्यांनी रूग्णास ग्रामीण रूग्णालय भूम येथे संदर्भीत केले. त्या बालकास पूर्वीपासून उपचार सुरू होते. या प्रकरणामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक चौकशी समिती नेमून सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे  सांगितले आहे.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !