विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा - निटुरे

विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा - निटुरे

धाराशिव दि.३० (प्रतिनिधी) - मराठा समाजाला आरक्षण द्यावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देता यावे व आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावावे अशी मागणी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटुरे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मागील अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबीत असून मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने अनेक आंदोलने केली आहेत. दरम्यान, मागील महिन्यात अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांनी उपोषण करून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. त्यावेळी सरकारने वेळ मागून घेतला. परंतू दिलेल्या आश्वासनाची अद्यापपर्यंत आरक्षणाची मागणी मान्य केलेली नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना तीव्र झालेल्या
असून गावोगावचे मराठा समाज बांधव आरक्षण प्रश्नावर आक्रमक झाले आहेत. त्यामुळे प्रश्न तात्काळ सोडविण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाज आरक्षणाचा ठराव एकमताने करून केंद्र सरकारकडे पाठवावा. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. अन्यथा होणाऱ्या परिणामास सरकार जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी, असा इशारा निटुरे यांनी दिला आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !