तुळजापूरच्या महाआरोग्य शिबिरासाठी शासनाकडून अतिरिक्त निधीची तरतूद

तुळजापूरच्या महाआरोग्य शिबिरासाठी शासनाकडून अतिरिक्त निधीची तरतूद

धाराशिव दि.१८ (प्रतिनिधी) - सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून श्री शारदीय नवरात्र महोत्सव तुळजापूर येथे सोलापूर रोडवरील घाटशीळ येथे २७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
         या महाआरोग्य शिबिराचा लाभ राज्यातील तसेच कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यांसह इतरही राज्यातील जवळपास ३ लाखांपेक्षा जास्त भाविक व यात्रेकरू घेतील असा अंदाज आहे. दि.१२ ते ३० ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या नवरात्र महोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांसाठी तुळजापूर येथे स्वतंत्र आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे.
पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित या महाआरोग्य शिबिरात लाभ घेणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता औषधी व इतर साहित्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून २ कोटी ८० लाख रुपये अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना औषधीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून देण्यात आलेल्या ६ कोटी रुपये निधीच्या व्यतिरिक्त आहे. याचबरोबर राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
तुळजापूर येथे नवरात्री दरम्यान तुळजापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयासह चार ठिकाणी अतिदक्षता विभाग कार्यरत आहे. १२ रुग्णवाहिका, १० दुचाकी रुग्णवाहिका व २० आरोग्य दूत पथके कार्यरत असून २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान तुळजापूरजवळील घाटशीळ येथे होणाऱ्या महाआरोग्य शिबिरासाठी अतिरिक्त निधीची तरतूद शासनाकडून करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !