शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग व बांबू लागवडीकडे वळणे ही काळाची गरज - ओंबासे

शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग व बांबू लागवडीकडे वळणे ही काळाची गरज - ओंबासे 



धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) - आर्थिक उन्नती व समृद्धीसाठी शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग आणि बांबू लागवडीकडे वळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी दि.१३ ऑक्टोबर रोजी केले.


 जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी व परळी येथील ग्लोबल विकास ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकासाठी मनरेगा विषयक बाबींचे पायाभूत प्रशिक्षण सत्र व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत मनरेगाच्या संकेतस्थळाबाबत एम.आय.एस. समन्वयक सुनिल जमादार यांनी सविस्तर माहिती दिली. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विहीत कार्य पध्दतीबाबत लोहारा येथील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्रीकांत लकुळा थोरात यांनी सविस्तर विश्लेषण केले. तर बांबू लागवड आणि फळबाग लागवड याबाबत धाराशिव येथील नरेगा सेलचे कृषी अधिकारी विक्रम वाघमोडे यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच रेशीम लागवड आणि महारेशीम अभियान याबाबत बाळासाहेब सुर्यवंशी व जिल्हा रेशीम अधिकारी डॉ. आरती वाकुरे यांनी सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेत महारेशीम अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्धारित १० हजार एकर क्षेत्रावरील लागवडीपैकी ६ हजार एकर क्षेत्रावरील लागवड आता कृषी विभागामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी विभागाला या उद्दिष्ट प्राप्तीसाठी सहकार्य मिळावे यासाठी तहसील स्तरावरील मनरेगा अंतर्गत कार्यरत कंत्राटी मनुष्यबळ उपलब्ध संसाधनासहित तालुका कृषी कार्यालयाकडे वर्ग करण्याच्या महत्वपूर्ण सूचना डॉ ओंबासे यांनी दिल्या. तसेच मनरेगा अंतर्गत रेशीम लागवड आणि बांबू लागवडीसाठी ग्लोबल विकास ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी प्रचार आणि प्रसिध्दीकरिता सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यशाळेसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी तसेच मंडळ अधिकारी, ग्लोबल विकास ट्रस्टचे समन्वयक मुक्तेश्वर कडवणे, विकास शेंडगे व स्वयंसेवक उपस्थित होते. प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेंद्रकुमार कांबळे यांनी या तर आभार अव्वल कारकून विनोद कोकाटे यांनी मानले.

 


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !