कुलकर्णी यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
कुलकर्णी यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
धाराशिव दि.६ (प्रतिनिधी) - छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते दि.६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आले.
पोलीसांच्या क्रिडा गुणांना वाव मिळावा, त्यांची शारिरीक व मानसिक क्षमता उंचवावी , संघभावना निर्माण व्हावी यापोलीस मुख्यालयातील क्रिडांगणावर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्देशाने धाराशिव पोलीस दलाच्या पोलीस मुख्यालयातील मैदानावर दि.६ ते दि.१२ ऑक्टोबर दरम्यान क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय या ५ पोलीस दलातील एकूण ४५० खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत खो-खो, कबड्डी, हॅड बॉल, बास्केट बॉल, व्हॉली बॉल, फुटबॉल, हॉकी, १०० मीटर- ४०० मीटर- ५००० मीटर धावणे, अडथळा शर्यत, जलतरण, तायकाँदो असे विविध क्रिडा प्रकार खेळले जाणार आहेत.
यावेळी उपस्थित सर्व खेळाडूंनी या क्रिडा स्पर्धा निकोप वातावरणात खिलाडू वृत्तीने पार पडावी यासाठी शपथ घेतली. तर कुलकर्णी यांनी निरोगी शरीरात निरोगी मन वास करते व खेळातून व्यक्तीमत्व विकास, नेतृत्व साधता येते, असे सांघत सर्व खेळाडूना शुभेच्छा दिल्या. अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, पोलीस उप अधीक्षक स्वप्नील राठोड, पोलीस निरिक्षक वासुदेव मोरे, श्रीनिवास कानगुडे, पोनि यशवंत जाधव, रापोनि अरविंद दुबे, सपोनि सचिन पंडीत, सिध्देश्वर गोरे, शाम डोंगरे यांच्यासह स्पर्धेसाठी आलेले पाचही घटकातील सर्व खेळाडू, पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित मोठ्या संख्येने होते.