चिकुंद्रा येथील आरोग्य शिबिरात ५०५ रुग्णांची तपासणी

चिकुंद्रा येथील आरोग्य शिबिरात ५०५ रुग्णांची तपासणी


धाराशिव दि.१८ (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथे घेण्यात आलेल्या मोफत सर्वरोग निदान व उपचार आरोग्य शिबिरात ५०५ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी १२१ रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्यामुळे त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. यावेळी सरपंच राजेंद्र गरड, राणबा जाधवर, उपसरपंच सुकेशनी मोटे, माजी उपसरपंच शाहुराज गायकवाड, शंकर मोटे, माधव मोटे, विजय गरड, सजंय मोटे, विश्वंभर मोटे, विजय गरड, सहदेव गरड, ज्योतीराम मोटे, ज्ञानेश्वर मोटे, संतोष मोटे, महादेव गरड, संजय गरड, अभंग मोटे, राम मोटे, करण गरड, लिंबराज गायकवाड, महादेव जाधव, भैरवणाथ गरड, अभिषेक गरड, अशोक गायकवाड, सुरेश गायकवाड, शंकर सर्जे, चंदन गायकवाड, मकरंद जाधवर, उमेश गरड, प्रसाद गरड आदी उपस्थित होते. यावेळी मुंबईचे  डॉ.अजित निळे, डॉ. ओम खानापूरे, डॉ. मयुर पाटील, डॉ. शैलेश खंदारे, डॉ. धन्वी मोरे, डॉ. निधी परदेशी यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निषीकांत लोकरे चिकुंद्र प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा स्वंयसेविका ‍राणी जाधव, शोभा ऐकंडे यांनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !