वडगाव (सि) येथे मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरु

वडगाव (सि) येथे मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरु

धाराशिव दि.३० (प्रतिनिधी) - मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील वडगाव (सि.) येथे साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. तसेच राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.
मनोज जरांग यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला ४० दिवसाचा वेळ दिला होता. ही मुदत २४ ऑक्टोबर रोजी संपल्यामुळे जरांगे यांनी पुन्हा अंतरवली सराटी येथे उपोषणास प्रारंभ केला आहे. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले. एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आल्या.
या साखळी उपोषणात गावातील मराठा समाजातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. उद्यापासून हे आंदोलन अधिक तिव्र करण्यात येणार आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !