तुळजाभवानी देवीची रथ अलंकारांने महापूजा

तुळजाभवानी देवीची रथ अलंकारांने महापूजा

धाराशिव दि.१८ (प्रतिनिधी) - तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात आज चौथ्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीच्या नित्योपचार पूजेनंतर रथ अलंकार महापूजा दि.१८ ऑक्टोबर रोजी बांधण्यात आली. भगवान सुर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री भवानी मातेस दिला. याप्रमाणे रथ अलंकार अवतार पूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.                 

दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. दि.१९ ऑक्टोबर रोजी मुरली अलंकार महापूजा, दि.२० ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, दि. २१ ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा व दि. २२ ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे. तत्पूर्वी दि.१७ ऑक्टोबर रोजी रात्री तिसऱ्या माळेच्या दिवशी अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आला.त्यानंतर धूप आरती करण्यात आली.रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात सिंह वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली.प्रक्शाळ पूजा झाली.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !