रोजगार निर्मितीसाठी ग्रामपंचायत स्तरावर २८ क्षेत्रात अभ्यासक्रम - आ. पाटील

रोजगार निर्मितीसाठी ग्रामपंचायत स्तरावर २८ क्षेत्रात अभ्यासक्रम - आ. पाटील



धाराशिव दि.१८ (प्रतिनिधी) - प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास योजनेंतर्गत शहराकडे होत असलेले स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे व स्थानिक पातळीवरच युवकांना रोजगार व स्वयंरोजगार निर्माण व्हावेत, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येत आहेत. याचा शुभारंभ दि १९ ऑक्टोबर रोजी सायं. ४ वाजता ऑनलाईन पद्धतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असून जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन तेर येथील रुक्मिणी मंगल कार्यालयात करण्यात आले आहे. 

मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात कौशल्यावर आधारीत शिक्षण व त्यातून उद्योग निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी कौशल्य आधारीत प्रशिक्षणातून उत्पादनक्षम युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शहराकडे होत असलेले स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे, स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगार निर्माण व्हावेत, यासाठी ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली होती.

राज्यात ५०० ग्रामपंचायतीमध्ये अशा प्रकारची केंद्र स्थापन करण्यात येणार असून धाराशिव जिल्ह्यातील तेर, बेंबळी, ढोकी, अणदुर, जळकोट, गुंजोटी, माकणी, शिराढोण, येरमाळा, तेरखेडा आसू व ईट अशा १२ ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये एक रुपयात पीक विमा, शेतकऱ्यांसाठी प्रती वर्ष ६ हजार रुपये, लेक लाडकी योजना, महिलांना बस प्रवासात सवलत यासारख्या अनेक क्रांतिकारी निर्णयांसह ग्रामपंचायत स्तरावरच कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !