तुळजाभवानी मातेची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा

तुळजाभवानी मातेची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा


 

धाराशिव दि.२२ (प्रतिनिधी) - शारदीय नवरात्र महोत्सवात रविवारी वारी दुर्गाष्टमी दिवशी श्री तुळजाभवानी देवीची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा दि.२ ऑक्टोबर रोजी मांडण्यात आली.  

श्री तुळजाभवानीची नित्योपचार पुजा व अभिषेक पूजेनंतर महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. ज्यावेळी महिषासुराने देवतांना हाकलून दिले व स्वत: स्वर्गाचा आनंद भोगू लागला. त्यावेळी साक्षात पार्वती अवतार असलेल्या श्री. तुळजाभवानी माता सर्व देवांच्या तेजापासून उत्पन्न झालेली जगदंबा माता भवानी आहे. हिने सर्व दैत्यांचा राजा महिषासुरचा वध केला व सर्व देवतांना स्वर्ग प्राप्तीचा आनंद दिला. त्यामुळे देवीला महाअलंकार घालण्यात येऊन महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.
तत्पूर्वी शनिवारी रात्री सातव्या माळेच्या दिवशी अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आला. त्यानंतर धूप आरती करण्यात आली. रात्री तुळजाभवानी मंदिरात पितळी गरुड वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली. 

‌         


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !