होळकर विद्यापीठातील विद्यार्थी पर्यटकांचे पर्यटन विकास समितीच्यावतीने स्वागत
होळकर विद्यापीठातील विद्यार्थी पर्यटकांचे पर्यटन विकास समितीच्यावतीने स्वागत
धाराशिव दि.९ (प्रतिनिधी) - सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील प्राचीन इतिहास आणि पुरातत्व शास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ माया पाटील - शहापूरकर या ४० विद्यार्थी व प्राद्यापकांसह धाराशिव लेणी व तेर अभ्यास वर्गासाठी पर्यटक म्हणून आल्याबद्दल पर्यटन विकास समितीच्यावतीने प्रा डॉ. पाटील-शहापूरकर, प्रा. डॉ ज्ञानेश्वरी हजारे, प्रा.डॉ सचिन शिंदे, प्रा.ज्ञानेश झरकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
दरम्यान, मराठवाडा नव्हे भारत मुक्ती संग्राम लढा हे पुस्तक देण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष युवराज नळे, प्रा अभिमान हंगरगेकर, रविंद्र शिंदे, शेषनाथ वाघ, गणेश वाघमारे, बाबासाहेब गुळीग, विजय गायकवाड, डॉ सिद्धार्थ तळभांडारे, जयराज खोचरे, सचिन दिलपाक आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.