धाराशिव कारखान्याचा बॉयलर अग्नि प्रदिपन व मोळी पूजन सोहळा पडला पार

धाराशिव कारखान्याचा बॉयलर अग्नि प्रदिपन व मोळी पूजन सोहळा पडला पार

धाराशिव दि‌२७ (प्रतिनिधी) - डि.व्ही.पी. उद्योग समुह धाराशिव साखर कारखाना लि., चोराखळी यूनिट क्र. १ या कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२२-२४ चा १२ या बॉयलर अग्नि प्रदिपन व मोळी पूजन कार्यक्रम समारंभ दि.२६ ऑक्टोबर रोजी सकाळी हभप डॉ. रंगनाथ काकडे महाराज (ढोराळेकर) यांच्या हस्ते बॉयलर अग्नि प्रदिपन तर खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ.कैलास पाटील यांच्या हस्ते मोळी पूजन समारंभ पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डि.व्ही.पी उद्योग समूहाचे संस्थापक व श्री विठठल स.सा.का. गुरसाळे पंढरपुरचे विद्यमान चेअरमन अभिजीत धनंजय पाटील उपस्थित होते. तसेच होमहवन पुजन कारखान्याचे संचालक संदिप अवादास खारे व त्यांच्या पत्नी भाग्यश्री खारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर धनंजय पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार कारखान्याचे जनरल मैनेजर ए. एस. पठाण यांनी मानले. हभप काकडे महाराज यांनी गळीत हंगाम २०२३-२४ यशस्वी पार पडावा यासाठी शुभाशिर्वाद व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर खा राजेनिंबाळकर व आ पाटील यांनी उपस्थित असलेले शेतकरी, सभासद, वाहतूक ठेकेदार यांना चालू हंगामांत धाराशिव साखर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस गाळपास देण्याचे आवाहन केले. गेल्या ६ वर्षापासून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेल्या कारखान्याने सन २०२३ २४ हंगामासाठी ऊस बिलाचा पहीला हप्ता २५०० रुपये घोषीत केला. तर कर्मचारी वर्गासाठी १५ दिवसांचा दिवाळी बोनस जाहीर केला व हंगामात ३ लाख मे.टन गाळप व २ कोटी इथेनॉल निर्मितीचे उद्दीष्ट ठेवल्याचे अभिजित पाटील यांनी सांगीतले. यावेळी सुरेश सावंत, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी, परिसरातील शेतकरी, सभासद, वाहतूक ठेकेदार, चाहन मालक आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !