कारखाना हा राजकरण करण्याचे ठिकाण नाही - प्रा. सावंततेरणेचे बाॅयलर पेटले

कारखाना हा राजकरण करण्याचे ठिकाण नाही - प्रा. सावंत

तेरणेचे बाॅयलर पेटले

ढोकी दि.२२ (प्रतिनिधी) - कारखाना काढणे सोपे आहे. मात्र चालवणे व टिकवणे फार अवघड आहे. त्यामुळे कारखाना हा राजकारण करण्याचे ठिकाण नसल्याचे प्रतिपादन चेअरमन प्रा शिवाजीराव सावंत यांनी ढोकी येथील भैरवनाथ शुगर वर्कस संचलीत तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या बाॅयलर प्रसंगी दि.२२ ऑक्टोबर रोजी केले.
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील साखर कारखान्याचे बॉयलर प्रदीपण करण्यात आले. यावेळी व्हाईस चेअरमन अनिल सावंत, कार्यकारी संचालक केशव उर्फ विक्रम सावंत, जिपचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत आदी उपस्थित होते. प्रारंभी तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै किसन तात्या समुद्रे यांचे नातु ढोकीचे उपसरपंच अमोल समुद्रे व त्यांच्या पत्नी कोमलताई समुद्रे यांच्या हस्ते बाॅयलर होम हावन विधीवत पुजा तर चेअरमन प्रा शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते बाॅयलर पुजन करण्यात मोठ्या उत्साहात पार पडले. पुढे बोलताना प्रा सावंत म्हणाले की, राजकारण तेरणा गेटच्या बाहेर ठेवा असे आवाहन सर्वाना केले सर्वानी निपक्षपातीपणाणे काम करुन पुन्हा तेरणा कारखान्यास गतवैभव निर्माण करुया असे त्यांनी सांगितले. तसेच माणुसकी शिवाय दुसरा कुठलाच पक्ष नाही. हा कारखाना एक तप गाळपा अभावी बंद होता. जेव्हा देवाला वाटते आपली भक्ती करतो. तेंव्हाच देव देतो हे देवाने ऐकून हा कारखाना चालू केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कारखान्यावर निवडून दिलेल्या संचालक मंडळाची जवाबदारी संरक्षण व जोपासणा करण्याची आहे, कारखाना खाण्यासाठी नाही असे त्यांनी ठणकावले.
पंढरीच्या पाडुरंगाने गोरोबा काकाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमितील माझ्या तेरणा कारखान्याचे गेल्या १२ वर्षांपासून हाल होत आहेत. तुम्ही जावा आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कारखाना चालु करा अशी सदबुध्दी आम्ही सावंत बुधुला दिल्याने हा कारखाना आम्ही घेतला असल्याचे सागितले. या कारखान्यावर शेतकरी कुटूंब, मोलमजुरी करणारे कुटूंब व उद्याच्या पिढीचे भवितव्य या कारखान्यावर असल्यामुळे हा कारखाना माझाच आहे असे म्हणून आपण सर्वानी मिळून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच पक्ष आता वेगळा व स्वार्थासाठी झाला आहे. कारखान्याच्या आत आल्यावर शेतकरी हाच माझा पक्ष आहे असे म्हणून आता १२ वर्षांनी पुन्हा कारखाना सुरु होत असल्यामुळे सर्वांनी जोमाने कामे करावीत असे सावंत यांनी सागितले. यावेळी व्हाईस चेअरमन अनिल सावंत, जिपचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, कार्यकारी संचालक केशव उर्फ विक्रम सावंत, रुतुराज सावंत, पृथ्वीराज सावंत, अनिल खोचरे, सुरज सांळुके, मोहन पणुरे, तालुका प्रमुख आजित लाकाळ, लक्ष्मण हुलजुते, आजित पिंगळे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी सभासद, कामगार, कारखान्याचे आधिकारी, जिल्हा बॅकेचे कार्यकारी संचालक विजय घोणसे, प्रशासकीय आधिकारी लावंड, कारखाना गटातील वयोवृध्द सभासद यामध्ये बाजीराव सावंत, सावता माळी यांच्यासह सरपंच, सोसायटीचे चेअरमन आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रंमाचे सुत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी तर आभार सुरज साळके यांनी मानले.

*

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !