४७१ गावांमध्ये राबविलीजलद ताप व किटक शास्त्रीय सर्वेक्षण मोहिम

४७१ गावांमध्ये राबविली
जलद ताप व किटक शास्त्रीय सर्वेक्षण मोहिम


    
धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी) - एक दिवशीय जलद ताप व किटक शास्त्रीय सर्वेक्षण धडक मोहीमेत वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांनी नोडल अधिकारी म्हणून काम पाहीले. ही मोहीम ग्रामीण व शहरी भागातील ५५ आरोग्य संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांमार्फत राबविण्यात आली. या मोहीमे अंतर्गत ४७१ गावांमध्ये जलद ताप व किटकशास्त्रीय सर्वेक्षण दि.२५ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.

ताप, डेंग्यु व चिकुनगुनीया या आजाराचे रुग्ण जिल्ह्यात वाढत आहेत. या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी २३ ऑक्टोंबर रोजी सर्व अधिकारी, कर्मचारी यांची जिल्हास्तरावरुन व्हीडीओ कॉन्फरन्स बैठक घेऊन कार्यवाही करण्याच्या आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.  जिल्ह्यात एकूण १६ हजार २६२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी १ हजार ३१० घरांमध्ये पाणी साठ्यामध्ये डास अळी आढळुन आली. त्यामध्ये एकुण ३७ हजार ६७८ पाणी साठ्याचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी १ हजार ५७४ पाणी साठ्यामध्ये अळीवाढ आढळुन आली. या सर्वेक्षणांमध्ये संशयीत ताप रुग्ण ३५७ व जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातील ताप रुग्ण ९ व संशयीत डेंग्यु रुग्ण १७ आढळुन आले. या मोहीमेमध्ये डास अळी वाढ, ताप रुग्ण व संशयीत डेंग्यु रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून कोरडा दिवस पाळणे, डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे व ताप रुग्ण सर्वेक्षण अबेट कार्यवाही करणे तसेच घरांच्या परिसरातील टायर्स, ट्युब, फुटकी भांडी आदी रिकामे करण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करण्यात येत असून त्यासाठी सर्व आरोग्य संस्थेमार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. तर नागरीकांनी आरोग्य यंत्रणेमार्फत ताप रुग्ण व संशयीत डेग्यु चिकुनगुनीया रुग्ण निर्दशनास आल्यास तात्काळ नजीकच्या आरोग्य संस्थेशी संपर्क करुन वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने उपचार घेण्यात यावा. ही मोहीम मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरीदास, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.इस्माईल मुल्ला व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.दिपक मेंढेकर याच्या मार्गदर्शनाखाली यशस्विरित्या राबविण्यात आली. 
                                         

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !