कांदा अनुदानासाठी स्वराज्य पक्षाचे रास्ता रोको आंदोलन
कांदा अनुदानासाठी स्वराज्य पक्षाचे रास्ता रोको आंदोलन
धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - राज्य सरकारने मंजूर केलेले कांदा अनुदान आंदोलन करून एक महिना झाले तरी न भेटल्यामुळे स्वराज्य पक्ष व शेतकऱ्यांच्यावतीने करमाळा रोडवर रास्ता रोको आंदोलन दि.१० ऑक्टोबर रोजी करण्यात आले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करीत १५ दिवसांत अनुदान वाटप करणार असल्याचे निबंधक कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले.
स्वराज्य पक्षाच्यावतीने कांदा अनुदानासाठी रास्ता रोकोच्या दरम्यान पक्षाचे राज्य संपर्कप्रमुख करण गायकर आले. आंदोलन मागे घेण्यासाठी निबंधक कार्यालयाच्यावतीने संजय जाधव हे पत्र घेऊन आले होते. परंतू राज्य संपर्कप्रमुख गायकर यांनी पत्र न स्विकारता २ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करा. अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यावेळी मराठवाडा संपर्कप्रमुख अमर शेख, जिल्हा उपाध्यक्ष आकाश जेधे, ऍड महेश चोपडे, राज्य कार्यकारणी सदस्य बाबा रोटे, तालुका कार्याध्यक्ष सुधीर लटके, अनिल माने, प्रदीप नाईकनवरे, बीड जिल्हा प्रमुख राहुल चाळ, राज्य कार्यकारिणी सदस्य विजय वावळे, श्याम मस्के, ऍड किरण पाटील, विजय गरड, सीताराम सातपुते, बापू धनवे, पांडुरंग रोडे, राजेंद्र पाटील, शहाजी साळुंखे, श्रीराम धनवे, संदीप गरड, सचिन कडबने, मनोज जगताप, श्रीमंत गरड, आबा तेलंगे, नागनाथ शिंदे, दरीबा शिंदे, राम गरड, आबा तेलंगे, नागनाथ शिंदे, दरीबा शिंदे, राम निखत, कृष्णा धनवेे, सुधीर शेळके, औदुंबर पाटील, बाबुराव गायकवाड, तुकाराम बारस्कर, महादेव चव्हाण, पंडित जगदाळे, राहुल गोपने, आनंद भोसले, ब्रह्मदेव बंडगर, परसराम कोळी, किशोर पाटील, महेश पाटील, पृथ्वीराज पाटील, धनराज पाटील, शुभम पाटील, जयराम धनवे आदी शेतकरी व स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.