पेयजल योजनेलाच अध्यक्ष, सचिव, सरपंच व ग्रामसेवक यांनीच पाजले थेट पाणी

पेयजल योजनेलाच अध्यक्ष, सचिव, सरपंच व ग्रामसेवक यांनीच पाजले थेट पाणी

धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) - गावकऱ्यांना गावांमध्येच पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे या एकमेव उद्देशाने शासन पेयजल योजना गावोगाव राबवित आहे. मात्र काही ठिकाणी या योजनेला भ्रष्टाचाराचे पाय कुठले आहेत. असाच प्रकार हावरगाव येथील योजनेबाबतीत घडला असून तेथील नियोजन समितीचे अध्यक्ष सचिव सरपंच व ग्रामसेवक यांनी संगणमत करून चक्क २३ लाख ५५ हजार रुपयांचा अपहार करुन शासनास चुना लावला आहे. त्यामुळे शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ असल्यास यांनी पेयजल योजनेलाच एक प्रकारे पाणी पाजण्याची कामगिरी केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कळंब तालुक्यातील हावरगाव येथे  राष्ट्रीय पेयजेल योजनेचे काम करण्यात आले. मात्र ते काम फक्त कागदपत्रे दाखवून समितीचे अध्यक्ष समिती अध्यक्ष चक्रधर साहेबराव कोल्हे, सचिव उषा अशोक कोकाटे, सरपंच अनिता गौतम हजारे, ग्रामसेवक एम.ए. शिंगाडे ग्रामसेवक सर्व रा. हावरगाव यांनी दिनांक १ जुलै २०१५ ते २०१७ या कालावधीमध्ये संगनमत करुन राष्ट्रीय पेयजेल पाणी पुरवठा समितीस २३ लाख ५५ हजार २९९ रुपयांची रक्कम अदा न करता कृष्णा कंट्रक्शन यांना पैसे अदा करुन शासकिय रकमेचा अपहार करुन फसवणूक केली आहे. या प्रकरणी ग्रामसेवक उज्वला नागनाथ झगडे यांनी दि.६ ऑक्टोबर २०२३ रोजी दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलीस ठाण्यात वरील आरोपी विरोधात भा.दं.वि.सं. कलम- ४२०, ४०९, ४४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !