आष्टा कासार येथे श्री स्वामी समर्थ सेंद्रिय गटाची आत्मा यंत्रणेतर्फे स्थापना
आष्टा कासार येथे श्री स्वामी समर्थ सेंद्रिय गटाची आत्मा यंत्रणेतर्फे स्थापना
लोहारा दि.९ (प्रतिनिधी) - तालुक्यातील आष्टा कासार येथे कृषी व संलग्न विभाग, तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा मार्फत श्री स्वामी समर्थ सेंद्रिय गटाची स्थापना करण्यात आली. या गटाला प्रकल्प संचालक आत्मा व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कैलास पवार यांनी शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करुन या गटाची संकल्पना, फायदे, महत्त्व लं सविस्तर मार्गदर्शन
करून गटाची स्थापना केली.
या गटात २३ शेतकऱ्यांची नोंदंणी करण्यात आली. ँ गट स्थापन करण्यात आले.
या गटाच्या अध्यक्षपदी सिद्रामप्पा तडकले यांची तर उपाध्यक्षपदी वि.का.से. सोसायटीचे चेअरमन शिवमुर्ती फुंड्डीपल्ले व सचिव तानाजी कागे यांची निवड करण्यात आली. यावेळी गटातील सर्व सभासद उपस्थित होते. तसेच राजमा पिकाची लागवड, बी-बियाणे, सेंद्रिय निविष्ठा, पाणी व्यवस्थापन आदीची सविस्तर माहिती कळंब तालुक्यातील सोनारवाडी येथील शेतकरी उमेश मोराळे, विक्रम घोळवे यांनी दिली. तर जास्तीत जास्त राजमाचे उत्पन्न काढण्यासाठी काय करावे ? यावर सविस्तर चर्चा केली. यावेळी सोनारवाडीचे उपसरपंच राजेंद्र घोळवे, प्रदीप घोळवे आदी शेतकऱ्यांनी मार्गदर्शन केले. तर राजमा पेरणीपासून ते काढणीपर्यंतचे प्रत्यक्ष मार्गदर्शन सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. आष्टा कासार येथे राजमा पिकाचे उत्पन्न गेल्या ७ वर्षापासून घेण्यात येत असून यावर्षी राजमा पिकाची लागवड १०० एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर होईल अशी अपेक्षा आहे. या चर्चेत सिद्राम तडकले, शिवमुर्ती फुंड्डीपल्ले, तानाजी कागे, गहिनीनाथ कागे, मुकेश मुळे, शरणाप्पा कुडूकले, अंदानी टिंकांबरे, मुकेश सोमवंशी, तात्या सोमवंशी, बालाजी काळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष योगीराज आळंगे, जयंत अष्टेकर, व्हा. चेअरमन बालाजी कोरे, सोनू कासार, दया पाटील, विजय टिकाबरे, बालाजी औटी, चंद्रकांत कासार, प्रदीप कोरे, योगीराज कुडुकले, जिनेन्द्र कासार आदी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन आष्टा कासारचे कृषी सहाय्यक सचिन पवार व श्री स्वामी समर्थ सेंद्रिय गटातील शेतकऱ्यांनी केले. उपस्थितांचे आभार लहू गायकवाड यांनी मानले.