सुरत-चेन्नई महामार्ग संदर्भात शेतकरी व अधिकारी परीसंवादाचे आयोजन
सुरत-चेन्नई महामार्ग संदर्भात शेतकरी व अधिकारी परीसंवादाचे आयोजन
धाराशिव दि.१७ (प्रतिनिधी) - जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत चेन्नई महामार्गाच्या भूसंपादनासंदर्भात शेतकरी व अधिकारी यांच्या परिसंवादाचे आयोजन दि.१८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता केले आहे. या संदर्भात ज्यांच्या अडचणी आहेत, अशा संबंधि सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातून भारत सरकारच्या भारत परीमाल योजने अंतर्गत सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग प्रस्तावित आहे. या महामार्गाचे सर्वेक्षणाचे काम पुर्ण झाले असून महामार्ग भुसंपादन प्रक्रिया सुरु आहे. शेतकऱ्यांचे भुसंपादित प्रकरणा संदर्भात काही तक्रारी व समस्या असून त्या तक्रारी निवारण करण्याच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाच्या सभागृहात शेतकरी व अधिकारी परीसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी, धाराशिव उपाधिक्षक भुमीअभिलेख, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ज्या शेतकऱ्यांची जमीन भुसंपादित झालेली आहे व भुसंपादना संबंधी काही तक्रारी व समस्या आहेत अशा सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.