कलाविष्कार अकादमीद्वारा मेलडी स्टार्सची संगीत मैफिल पडली पार
कलाविष्कार अकादमीद्वारा मेलडी स्टार्सची संगीत मैफिल पडली पार
धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) - शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा सांगता दिनी कलाविष्कार अकादमीद्वारा मेलडी स्टार्स संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह पोलीस विभागाच्यावतीने मेलडी स्टार्सच्या कलावंतांना उद्घाटनप्रसंगी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मेलडी स्टार्सचे मुख्य प्रवर्तक युवराज नळे समन्यवक रवींद्र कुलकर्णी, शेषनाथ वाघ, तौफीक शेख, शरद वडगांवकर, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत, पोलीस निरीक्षक उस्मान शेख, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या पत्नी महिमा कुलकर्णी, प्रगती शेरखाने, पल्लवी कुलकर्णी, श्रेया गायकवाड, नंदिनी गाडे, मुनीर शेख यांनी गायन केले या मेलडी स्टार संगीत मैफिलीस प्रमुख जिल्हा न्यायाधीश शेंडे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, अस्मिता ओंबासे, कांवत, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रीय पोलीस अधिकारी पोलीस उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रभाकर चोराखळीकर यांनी केले.