गोळी मारुन ठार मारणाऱ्या आरोपीस ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

गोळी मारुन ठार मारणाऱ्या आरोपीस ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

धाराशिव दि.१६ (प्रतिनिधी) - हात उसने दिलेल्या पैशाच्या कारणावरून एकास परवानाधारक रिवालव्हरमधून गोळी झाडून जीवे ठार मारण्याची घटना फेब्रुवारी २०२० मध्ये घडली होती. त्या आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश उगले यांनी जन्मठेपेसह आर्थिक दंडाची शिक्षा दि.१३ ऑक्टोबर रोजी ठोठावली आहे.
दि.२९ फेब्रुवारी २०२० रोजी १२ ते १२ वाजण्याच्या सुमारास भूम तालुक्यातील पाटसांगवी येथील बाबा उस्मान पटेल (वय ३४ वर्षे) याने दस्तगीर जिलानी पटेल यास हात उसने दिलेले पैसे परत घेण्याच्या कारणावरुन त्याच्या जवळील लायन्सनधारी रिव्हॉलव्हरने गोळी झाडून जिवे ठार मारुन शस्त्र अधिनियमाचे उल्लघंन केले. या प्रकरणी भूम पोलीस ठाण्यात गुरनं ३१/२०२० भादंविसं कलम ३०२ सह शस्त्र अधिनियम कलम ३० प्रमाणे दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ नेमणुक यांनी करुन आरोपी बाबा पटेल याच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या गुन्ह्यात भूम येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश उगले यांनी पटेल या आरोपीस दोषी धरुन खुनासाठी जन्मठेप व १० हजार रुपये दंड तसेच शस्त्र अधिनियम उल्लघंनासाठी ६ महिने सश्रम कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा दि. १३ ऑक्टोबर रोजी रोजी सुनावली आहे. या खटल्यात शासकीय अभियोक्ता म्हणून गाडे यांनी कामकाज पाहिले आहे. तसेच पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे व भूमच्या उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांनी व भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांनी वेळोवेळी या खटल्याचा पाठपुरावा करुन कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून येरमाळा पोलीस ठाण्याचे सपोउपनि बी.एम. बळे यांना सूचना देवून आढावा घेत होते. त्यामुळे त्या आरोपीस न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे शिक्षा ठोठावली आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !