ठाकरे नगर नवरात्र महोत्सवाची छबिना मिरवणूकीने सांगता
ठाकरे नगर नवरात्र महोत्सवाची छबिना मिरवणूकीने सांगता
धाराशिव दि.३० (प्रतिनिधी) - शहरातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नगर नवरात्रोत्सव समितीच्यावतीने स्थापना करण्यात आलेल्या देवीची छाबिना मिरवणूक कोजागिरी पौर्णिमेस काढण्यात आली. तर देवीच्या महाआरतीने नवरात्र महोत्सवातील धार्मिक कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.
मिरवणुकीच्या प्रारंभी आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण बांगर यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली. ही मिरवणूक प्रभाग ४ मधील प्रमुख मार्गावरून ही काढण्यात आली. यावेळी महिला मुली यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. यावेळी महिला व युवतींनी पोत खेळणे, दांडीया खेळणे तसेच महीला कार्यकारणी सदस्य यांना साडी, चोळी आहेर मंडळाचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांच्यावतीने देण्यात आला. तर वेषभूषा व डान्स स्पर्धांसह इतर उपक्रम राबविण्यात आले. तसेच साळुंके यांनी सर्व देवी भक्ताचे स्वागत करून आभार मानले. नवरात्र महोत्सव कालावधीत ठाकरे नगर नवरात्र महोत्सव समितीच्यावतीने सुंदर हस्ताक्षर, रांगोळी, संगीत खुर्ची, आराधी गीतांचा मेळा आदींसह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. तर प्रमुख पाहुणे व देवी भक्तांना १५१ तुळशींची रोपे देण्यात आली. या कार्यक्रमास ठाकरेनगर, अष्टविनायक चौक, संभाजी नगर, नारायण कॉलनी व शाहू नगरसह परिसरातील भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यासाठी नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्ष सुरेखा खांडेकर, उपाध्यक्ष रुपाली गाभणे, माया साळुंके, सचिव प्रतिभा गाडे, श्रद्धा उगलमुगले, रेश्मा ढगे, लता राठोड, मिरवणुक प्रमुख सत्यशिला गायकवाड, दिपाली चौधरी, योजना सलगर, जमंगल सलगर, मीना महामुनी, कोमल कदम, खोत, छाया वेदपाठक, लता इंगळे, इंदुमती जगताप, शितल कस्पटे, सुरेखा पवार, हिराबाई बंडगर, अनिता शेंडगे, विमल साठे, ज्योती ढगे, शुभांगी काळे, विमल हनुमंत माने, दिपाली चंद्रकांत गायकवाड, वैशाली बिराजदार, अनारकली शिंदे, रुक्मिणी सुरवसे, राजकन्या साळुंके, जयश्री सोनटक्के, स्वप्नाली गावकरे, सुचिता ननवरे, आशा गाते, सारिका देडे, शोभा सोकांडे, शामल साळुंके यांच्यासह इतर महिला भाविकांनी परिश्रम घेतले.