हिंगळजवाडी येथील आरोग्य शिबिरात ४४३ रुग्णांची तपासणी
हिंगळजवाडी येथील आरोग्य शिबिरात ४४३ रुग्णांची तपासणी
धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) - तालुक्यातील हिंगळजवाडी येथील मोफत सर्वरोग निदान व उपचार आरोग्य शिबिरामध्ये ४४३ रुग्णांची विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात दि.२२ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.
तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ९१ रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्यामुळे त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. यावेळी जेष्ठ विश्वस्त बाळासाहेब वाघ, ऍड रमेश भोसले, ग्रा.प.सदस्य पोपट राऊत, रविंद्र गोरे, रमेश वाकुरे, गजेंद्र गोरे, अशोक वाकुरे, वसंतराव गोरे, वसंतराव गोरे, नेताजी जाधव, बिभीषण जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. शिवम येवारे, डॉ. श्रध्दा केदार, डॉ. धनश्री गरड, डॉ. मानसी कानेरक यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे आमिन सय्यद, विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निशीकांत लोकरे आशा स्वंयसेविका बाहुले, आशा, दत्तात्रय व जि.प.शाळा मदतनीस जयश्री शिंदे यांनी परिश्रम घेतले.