कृष्णा खोऱ्यातील चौथ्या टप्प्याचे काम सुरू करण्याची चालू यांची‌ फडणवीस यांच्याकडे मागणी

कृष्णा खोऱ्यातील चौथ्या टप्प्याचे काम सुरू करण्याची चालू यांची‌ फडणवीस यांच्याकडे मागणी

धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) - कृष्णा खोऱ्यातील चौथ्या टप्प्यातील पाणी अवर्षणग्रस्त उमरगा व लोहारा तालुक्यांना देण्यासाठी तातडीने काम सुरू करण्यात यावे अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून योजनेच्या चौथ्या टप्प्यात उमरगा व लोहारा तालुक्याला पाणी मिळणार आहे. हे तालुके अवर्षणग्रस्त असून बहुतांश लोकांचा व्यवसाय शेतीवर अवलंबून आहे. निसर्गाच्या सततच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. यासाठी हे काम लवकरात लवकर सुरू होऊन पाणी उपलब्ध झाले तर या भागात हरितक्रांती होऊन आर्थिक सुबत्ता येईल. तसेच या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात नवसंजीवनी आणावी, असे नमूद केले आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !