शासनाकडे प्रस्ताव पाठविल्यानंतर पवार यांचे उपोषण स्थगित
धाराशिव दि.१६ (प्रतिनिधी) - लोकनेते गोपीनाथ मुंढे ऊसतोड कामगार महामंडळ महाराष्ट्र इमारत बांधकाम व इतर कल्याणकारी महामंडळाकडे हस्तांतरण करण्याच्या प्रक्रिया विरोधात तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांनी सुरू केलेले आमरण उपोषण सहाय्यक समाज कल्याण विभागाच्यावतीने शासन स्तरावर मागणीचे पत्र पाठवून दिली. त्यामुळे ते आमरण उपोषण दि.१६ ऑक्टोबर रोजी स्थगित केले आहे.
यावेळी समाज कल्याण विभागामार्फत निरीक्षक ए.एस. मगर, निरीक्षक ए.ए. जगताप, लिपिक एस.एस. जगताप यांनी उपोषण स्थळी येऊन उपोषणकर्ते पवार यांना ज्यूस पाजून उपोषण मागे घेण्यासाठी सांगितले. त्यावेळी संघटनेच्यावतीने समाज कल्याण विभागाचे आभार मानण्यात आले.