रा.गे. शिंदे महाविद्यालयाचा विद्यार्थी मोहम्मद शहाबर्फीवाले एमबीबीएससाठी पात्र

रा.गे. शिंदे महाविद्यालयाचा विद्यार्थी मोहम्मद  शहाबर्फीवाले एमबीबीएससाठी पात्र


      
परांडा दि. (प्रतिनिधी) - येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयातील इयत्ता बारावी विज्ञान वर्गाचा विद्यार्थी तथा परंडा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष बाशा शहबर्फीवाले यांचे चिरंजीव मोहम्मद कैफबाशा शहाबर्फीवाले याचा एमबीबीएससाठी हैद्राबाद येथे प्रवेश झाल्याने महाविद्यालयाच्यावतीने त्याचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतीक विभागाच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ सुनिल जाधव, प्रा डॉ एच.एम. गायकवाड, गणित विभाग प्रमुख डॉ विद्याधर नलवडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख, प्रेरणा शाळेचे शिक्षक शरद झोंबाडे-देशमाने, बावची विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायन खैरे आदी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्रा केशव शेटे, प्रा विजय जाधव, प्रा संतोष भिसे, प्रा शंकर कुटे, प्रा प्रताप घुटे, प्रा किर्ती पायघन-नलवडे, प्रा प्रतिभा माने व कैफबाशा शहाबर्फीवाले उपस्थित होते. शहाबर्फीवाले याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !