जनतेचा खा. पवार यांच्या कामावर विश्वास असल्याने पदाधिकाऱ्यांनी झोकून काम करावे - टोपे
धाराशिव दि.२ (प्रतिनिधी) - मराठवाड्यातील जनतेचा खा.शरदचंद्र पवार यांच्या कामावर विश्वास आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला, दिनदलित, अल्पसंख्यांक व भटके विमुक्त यांच्यासाठी झोकून देवून काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पाटीर्चे धाराशिव जिल्ह्याचे संपर्क नेते माजी आरोग्य मंत्री आ. राजेश टोपे यांनी दि.३० सप्टेंबर रोजी केले.
धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये त्यांनी शासकीय योजना, पक्षाने केलेली कामे, विविध योजनेची माहिती सामान्य मानसांपर्यंत पोहोचविण्या संदर्भात विस्तृत माहिती दिली. यावेळी माजी आमदार राहुल मोटे, जीवनराव गोरे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर, जिल्हा नेते संजय निंबाळकर, प्रा. संजय कांबळे, डॉ प्रतापसिंह पाटील, शहराध्यक्ष अय्याज शेख, युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश तांबारे, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, जिल्हा उपाध्यक्ष-कादर खान, विधानसभा अध्यक्ष अमित शिंदे, महिला अध्यक्षा मनिषाताई राखुंडे, युवती जिल्हाध्यक्ष श्वेताताई दुरुगकर, सांस्कृतिक जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, जेष्ठ नेते आर.डी. सुळ, बाबा मुजावर, मृत्युंजय बनसोडे, तालुकाध्यक्ष ऍड संदीप खोसे, हनुमंत पाटूळे, धैर्यशील पाटील, श्याम घोगरे, संजय पवार, सुरेश टेकाळे, मुस्सदीक सिद्दीकी, रंजीत गायकवाड,युवक प्रदेश चिटणीस- रोहीत बागल, मजहर शेरीकर, आदित्य गोरे, तुषार वाघमारे,रणजीत वरपे, नशिरशहा बफीर्वाले, अशोक जाधव, नंदू शिंदे,अक्षय परमेश्वर, गणेश नन्नवरे, प्रशांत कवडे, श्रीहरी नाईकवाडी, गौरीशंकर साठे, अविनाश रेणके, बाळू माशाळ, बाळासाहेब मोटे, दौलत गाढवे, अनिल जाधव, नामदेव चव्हाण, नानासाहेब नलावडे, अशोक भिरंजे, अतुल आदमाने, सरफराज कुरेशी, पंकज भोसले, अमर गुंड, पृथविराज मुळे, हेमंत भोरे, अभिजीत काळे, सुरज वडवले, सुभाष गव्हाळे, कुणाल कर्णवर, राजपाल दुधभाते, अजिंक्य हिबारे यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.