सुनेत्राताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, सर्व रोग निदान शिबिरास प्रतिसाद

सुनेत्राताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, सर्व रोग निदान शिबिरास प्रतिसाद 

धाराशिव दि.१७ (प्रतिनिधी) - सुनेत्राताई अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्यावतीने दि.१७ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान व सर्व रोग निदान शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला.
 
या  सर्व रोग निदान शिबिरामध्ये तज्ञ व अनुभवी डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती  शिबिरामध्ये उपस्थित नागरिकांना सांगण्यात आली. रक्त संकलन रेणुका ब्लड बँकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले. तर सर्व रोग निदान शिबिरासाठी सुविधा हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार केले. यावेळी वृद्ध व्यक्ती, महिला, लहान बालके यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज जगताप, सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक सेलचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फड, धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे, धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, धाराशिव युवक तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे, धाराशिव महिला तालुकाध्यक्ष अप्सरा पठाण, सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष सुहास मेटे, तुळजापूर युवक तालुकाध्यक्ष नितीन रोचकरी, तुळजापूर तालुका उपाध्यक्ष गोविंद देवकर, धाराशिव युवक शहर कार्याध्यक्ष संदीप बनसोडे, सामाजिक न्याय सेलचे जिल्हा सहसचिव राजाभाऊ जानराव, युवक जिल्हा संघटक सुदर्शन करंजकर, विद्यार्थी तालुका सचिव सागर गाढवे, अनमोल शिंदे, महेश नलावडे, अमोल कसबे, विनोद अवतारे, शहाजी राऊत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !