महात्मा गांधी व्यसनमुक्ती सप्ताहाचे उद्घाटन


महात्मा गांधी व्यसनमुक्ती सप्ताहाचे उद्घाटन
धाराशिव दि.२ (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग व यश मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त महात्मा गांधी व्यसनमुक्ती सप्ताह २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. या सप्ताहाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण सभागृहात  करण्यात आले.  कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, कार्यकारी अभियंता ढवळे, उपशिक्षणाधिकारी शिवाजीराव फाटक, समाज कल्याण निरीक्षक एम.एस. शिंदे, यश मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप तांबारे, बालाजी पवार, समाज कल्याण विभागाचे लेखा अधिकारी सुधीर जाधवर आदी उपस्थित होते.
  प्रारंभी महात्मा गांधी व दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रस्ताविकित डॉ. तांबारे यांनी सप्ताह दरम्यान राबविण्यात येणाऱ्या महिला मेळावा, युवक मेळावा, कामगार कार्यशाळा, व्यसनमुक्ती चर्चासत्र इत्यादी उपक्रमाविषयी माहिती दिली. तर डॉ. तांबारे लिखित झेप व्यसनमुक्ताची भविष्याकडे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. शाहीर राणा जोगदंड यांच्या पथकाने व्यसनमुक्ती गीत सादर केले. तसेच डॉ. मिटकरी यांनी महात्मा गांधीच्या विचारावर आचरण केल्यास आयुष्यभर कुठलेही व्यसन लागणार नसल्याचे सांगितले. सूत्रसंचालन शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी दत्तात्रय जंगम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समाज कल्याण निरीक्षक एम.एस. शिंदे, लेखाधिकारी सुधीर जाधवर, राजेश तामाने, नानासाहेब देशमुख, अतुल चौधरी व राजकुमार मुंडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !