जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांनी केली होम हवनची विधीवत पुजा

जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांनी केली होम हवनची विधीवत पुजा

धाराशिव दि.२३ (प्रतिनिधी) - श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान अध्यक्ष डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते सपत्नीक शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली. यामध्ये दुपारी ३ वाजता वैदिक हवनास सुरुवात झाली. दुर्गा सप्तशती, तुळजा सहस्त्रनाम, भवानी सहस्त्रनाम, नवग्रह याचे हवन करण्यात आले. रात्री ८.१० वाजता पूर्णाहुती करण्यात आली. नंतर परंपरेनुसार कोल्हापूर संस्थान व हैद्राबाद संस्थान येथे पूर्णाहुती करण्यात आली. श्री गणेश विहारमध्ये हैद्राबाद संस्थानतर्फे विशाल कोंडो हे सपत्नीक हवन करण्यास उपस्थित होते. कोल्हापूर संस्थानच्यावतीने उपाध्ये प्रतीक प्रयाग सपत्नीक हवन करण्यास उपस्थित होते. त्यानंतर श्री तुळजाभवानी देवीची पाद्य पूजा व आरती जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात येऊन ब्रह्मवृंदांनी आशिर्वाद दिले. हा धार्मिक विधी आनंदाने आणि उत्साहाने दि.२२ ऑक्टोबर रोजी पार पडला.
             यावेळी अर्चनाताई पाटील, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसिलदार तथा मंदिर संस्थान व्यवस्थापक (प्रशासन) सोमनाथ माळी, मंदिर संस्थानचे लेखाधिकारी सिध्देश्वर शिंदे, सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, सहायक जनसंपर्क अधिकारी गणेश मोटे, धार्मिक अधिकारी काटकर, महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, चिलोजी बुवा यांच्यासह नागेशशास्त्री, नंदीबुवा, राजाराम अंबुलगे, सुनित पाठक, राजन पाठक, राजू प्रयाग, शैलेश पाठक, प्रल्हाद पैठणकर, अनंत कांबळे, मयुर कमठाणकर तसेच भोपे, पाळीकर, उपाध्ये मंडळ व पुजारी मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.  

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !