चारा वैरण बियाणे वाटप वैयक्तिक लाभ योजनेसाठी अर्ज करावेत
- Get link
- X
- Other Apps
चारा वैरण बियाणे वाटप वैयक्तिक लाभ योजनेसाठी अर्ज करावेत
धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने २०२४-२४ या आर्थिक वर्षात चारा टंचाईच्या अनुषंगाने वैरण बियाणे वाटप वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी दि. २५ ऑक्टोबर ते दि. ३ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज मागणी करण्यात येत आहेत. दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम (वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम ) वैरण बियाणे वाटप करणे. दि. ४ नोव्हेंबर नंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी आपल्या कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकिय दवाखाने, पशुधन विकास अधिकारी (वि.) पंचायत समिती येथे संपर्क साधावा अर्जाचा विहित नमुना, मार्गदर्शक सुचना, नियम, अटी व सोबत जोडावयाची कागदपत्राची सुची पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती सर्व उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तसेच . एन.आय.सी. www.dharashiv.nic.in या संकेतस्थळावर अर्जाचे नमुने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तरी जास्तीत जास्त लाभार्थीनी उक्त योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुजारी यांनी केले आहे.
- Get link
- X
- Other Apps