चारा छावण्या सुरू न करता थेट पशुपालकांच्या खात्यावर अनुदान देण्याची मागणी
चारा छावण्या सुरू न करता थेट पशुपालकांच्या खात्यावर अनुदान देण्याची मागणी
धाराशिव दि.१८ (प्रतिनिधी) - भूम तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांसाठी चारा छावण्या कोणत्याही सेवाभावी संस्थेच्या सुरु न करता चाऱ्याची रक्कम थेट पशुपालकांच्या खात्यावर जमा करण्यात यावी अशी मागणी महाविकास आघाडी भूम तालुका व शहराच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे दि.१८ ऑक्टोबर रोजी केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता हे भूम तालुक्याची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील उपस्थित होत्या. भूम तालुक्यामध्ये थोडाफार प्रमाणात पाऊस झाला असल्यामुळे सध्या पशुसाठी चारा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच सध्या लंपी या आजाराचे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचा शासनाचा अहवाल आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामधील जनावरांचे बाजार बंद आहेत.
या निवेदनावर रुपेश शेंडगे, अनिल शेंडगे, विलास शाळू, मोईज सय्यद, शेखापुरकर, अखतर जमादार, तानाजी पाटील, प्रवीण खटाळ, संदीप बोराडे, सुनील गपाट आदींच्या सह्या आहेत.