भाविकांना टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून भुतानी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी

भाविकांना टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून भुतानी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी 

धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) - तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी भाविकांची शौचालयाची गैरसोय होऊ नये यासाठी शौचालय बसविण्याचे काम नवी दिल्ली येथील भुतानी इंटरनॅशनल प्रा.लि. या कंपनीस दिले होते. मात्र त्या कंपनीने दि.१७ ऑक्टोबरपर्यंत एकही शौचालय बसविलेले नाही. त्यामुळे त्या कंपनीवर कारवाई करून तिचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी तुळजापूर येथील रहीम शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, नवरात्र महोत्सवात तुळजापुर शहरात दाखल होणाऱ्या भाविकांसाठी शौचालयची गैरसोय होवू नये यासाठी ३५ टॉयलेट पुरवठा निविदा काढली होती. नवी दिल्ली येथील भुतानी इंटरनॅशनल प्रा.लि या कंपनीला या कामाचा कार्यारंभ आदेश दिला होता. ते टॉयलेट तुळजापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी दि.१५ ऑगस्ट बसवायचे होते. मात्र दि.१७ ऑगस्टपर्यंत त्या टॉयलेटच्या फिटिंगचे काम सुरू होते. यात्रा सुरू झाली असून वेळेत टॉयलेट बसविले नसल्यामुळे भाविकांची प्रचंड गैरसोय झाली व होत आहे. तसेच काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था देखील नाही. तर काही ठिकाणी बसवलेल्या टॉयलेट या अस्वच्छ आहेत. हा प्रकार म्हणजे भाविकांच्या आरोग्याशी खेळण्यासारखा आहे. एकीकडे शासन राज्यात महा आरोग्य शिबिर घेत आहे. तर दुसरीकडे तुळजापुर येथे मात्र भुतानी कंपनी ही भाविकांच्या आरोग्याशी खेळत आहे. करारातील अटी व शर्तींचा भंग या कंपनीने केला असून १५ ते १७ ऑक्टोबरपर्यंत ३ दिवसांचे टॉयलेटचे भाडे अदा करण्यात येवू नये, अशी मागणी शेख यांनी केली आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !