देवकुरळी येथील आरोग्य शिबीरात ३१० रुग्णांची तपासणी
- Get link
- X
- Other Apps
देवकुरळी येथील आरोग्य शिबीरात ३१० रुग्णांची तपासणी
धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुक्यातील देवकुरळी येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य ३१० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार दि.८ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.
या शिबिरात तपासणी व उपचार करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ७० रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्यामुळे त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच हनुमंत जाधव, चेअरमन व संयोजक अदिनाथ जाधव, बाळासाहेब खलाटे, ब्रम्हानंद जाधव, अभिजित जाधव, श्रींकात जाधव, रगुनाथ जाधव, आण्णासाहेब जाधव, सुभाष राऊत, परमेश्वर जाधव, राजकुमार जाधव, अमोल जाधव, राहुल खलाटे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. श्रुती सांगवी, डॉ. धनवी पारेख, डॉ. दृष्टी शहा, डॉ. रिया जैन, डॉ. श्रेया कातीरा यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निषीकांत लोकरे देवकुरळी उपकेंद्राच्या आशा स्वंयसेविका सोनाली नवगीरे, सुनंदा मस्के यांनी परिश्रम घेतले.
- Get link
- X
- Other Apps