आवाड शिरपुरा येथील ग्रामस्थांशी दुधगावकर यांनी संवाद साधला

आवाड शिरपुरा येथील ग्रामस्थांशी दुधगावकर यांनी संवाद साधला

धाराशिव दि.८ (प्रतिनिधी) - कळंब तालुक्यातील आवाड शिरपुरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी एक तास राष्ट्रवादीसाठी, राज्याच्या विकासासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते.  यावेळी दुधगावकर यांनी आवाड शिरपूर बैठक घेत ग्रामस्थांशी संवाद साधला.
    यावेळी ग्रामस्थांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमधील विविध अडचणी नमूद केल्या. २०२३ मधील जिल्ह्यातील ५७ मंडळांना अग्रीम मिळावा, सततच्या पावसाचे राहिलेल्या अनुदान मिळावे, २०२२ चा खरीप पीक विमा समान पद्धतीने वाटप करावा, ५० हजार रुपये नियमित कर्ज भरणाऱ्या  शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात अजून मिळाले नाहीत ते मिळावे, शाळांचे खाजगीकरण थांबवावे, कंत्राटी नोकर भरती थांबवावी, पीक कर्ज देण्यासाठी काही राष्ट्रीयकृत बँका शिबील व अनेक अडचणी सांगून कर्ज नाकारीत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे, लासरा बॅरेजेसमध्ये गेलेल्या जमिनीचा मावेजा मिळावा, कळंब तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्त करावेत आदी मागण्या ग्रामस्थांनी मांडल्या. या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी सतत प्रयत्नशील राहील, असे आश्वासन  दुधगावकर यांनी दिले.
  यावेळी प्रकाश मुंदडा, डॉ. उत्तम खोडसे, भाऊसाहेब पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किशोर आव्हाड, उपाध्यक्ष प्रदीप काळदाते, बबनराव काळदाते, श्रीराम काळदाते, दिलीप आव्हाड, सुबोध आव्हाड, काकाजी काळदाते, दत्ता आव्हाड, बळीराम काळदाते, प्रशांत आव्हाड, दौलत रिचपुरे, हनुमंत रिचपुरे, अनिल काळदाते, प्रशांत आव्हाड, श्याम आव्हाड, बिभीषण लोंढे, बन्सी भोसले, अंकुश भोसले, सत्यनारायण भोसले, वसंतराव काळदाते, पांडुरंग काळदाते, अमोल काळदाते, सुधाकर काळदाते, विनोद मोरे, वसंत लोंढे, गोपाळ आव्हाड, सुजित आव्हाड, रामचंद्र आव्हाड, शिवाजी काळदाते आदी ग्रामस्थ, शेतकरी, शेतमजूर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार किशोर आव्हाड यांनी मानले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !