लोहारा येथे कलश व रथयात्रेचे स्वागत
- Get link
- X
- Other Apps
लोहारा येथे कलश व रथयात्रेचे स्वागत
लोहारा दि.३ (प्रतिनिधी) - विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यावतीने संपूर्ण जिल्ह्याभरात कलश व रथयात्रा काढण्यात आलेली आहे. ही यात्रा लोहारा येथील भारतमाता मंदिर येथे आल्यानंतर तिचे स्वागत व कलशाचे पूजन दि.३ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. यावेळी चंदनशिवे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा १६ व्या शतकात राज्य अभिषेक झालेले एकमेव हिंदू राजे होते. हा इतिहास पुढच्या पिढीला माहित होण्यासाठी या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा धर्म प्रसारक प्रमुख मुरलीधर कुलकर्णी, बबनगिरी उंडरगावकर महाराज, दत्ता सलगरे, दिनकरराव जावळे पाटील, भारतमाता मंदिरचे शंकर जाधव, शहाजी जाधव, बालाजी चव्हाण, यशवंत चंदनशिवे, दगडु तिगाडे, कल्याण ढगे, प्रमोद पोतदार, मनोज तिगाडे, विदेश स्वामी, अशोक तिगाडे, युवराज जाधव आदी उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps