महिमा अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते महाआरती
धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) - शहरातील ठाकरेनगर येथील नवरात्र उत्सव मंडळाच्या देवीची जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पत्नी महिमा कुलकर्णी यांच्या हस्ते महाआरती दि.२१ ऑक्टोबर रोजी रात्री करण्यात आली.
महाआरतीनंतर कुलकर्णी यांचा मंडळाच्यावतीने महिलांच्या हस्ते तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आनंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, ओबीसी संघटनेचे जिल्हा संयोजक धनंजय शिंगाडे यांचा मंडळाच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत साळुंके यांनी नवरात्र उत्सव कालावधीत घेण्यात येत असलेल्या धार्मिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रमाची माहिती दिली. महाआरती व सत्कार सोहळ्यानंतर दांडिया प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच महिलांसाठी विविध धार्मिक कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर, रांगोळी यासह विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या उपक्रमाला ठाकरेनगर, अष्टविनायक चौक, शाहूनगर येथील भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावेळी नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्ष सुरेखा खांडेकर, उपाध्यक्ष रुपाली गाभणे, माया साळुंके, सचिव प्रतिभा गाडे, श्रद्धा उगलमुगले, रेशमा ढगे, लता राठोड, मिरवणुक प्रमुख सत्यशिला गायकवाड, दिपाली चौधरी, योजना सलगर, मंगल सलगर, मीना महामुनी, कोमल कदम, खोत, छाया वेदपाठक, लता इंगळे, इंदुमती जगताप, शितल कस्पटे, सुरेखा पवार, हिराबाई बंडगर, अनिता शेंडगे, विमल साठे, ज्योती ढगे, शुभांगी काळे, विमल हनुमंत माने, दिपाली गायकवाड, वैशाली बिराजदार, अनारकली शिंदे, रुक्मिणी सुरवसे, राजकन्या साळुंके, जयश्री सोनटक्के, स्वप्नाली गावकरे, सुचिता ननवरे, आशा गाते, सारिका देडे, शोभा सोकांडे, शामल साळुंके आदीं उपस्थित होते.