तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप

तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप

उमरगादि.२० (प्रतिनिधी) -  उपविभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या हस्ते  करण्यात आले.
 तुळजापूर येथे कर्नाटकातून हजारो  भाविक दर्शन घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्गवरून पायी जातात. त्यामुळे शुक्रवारपासून राष्ट्रीय महामार्ग जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळे भक्तीतून सामाजिक कार्य व्हावे या हेतूने उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या संकल्पनेने शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून दिवसभर या भाविकांना सफरचंद, केळी, पाणी बॉटल, चिक्की व चहा वाटपाचा कार्यक्रम पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनेक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी अव्वल कारकून एजाज पटेल, सुशांत गाजलवार, महसूल कर्मचारी शिवलींग एरटे, कालिदास पवार, ब्रह्मानंद मठपती, दस्तगीर पठाण, जाकीर औटी, वसीम शेख, मुस्तफा शेख, संतोष राठोड, संगणक चालक आनंद पुराणिक आदी कर्मचारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !