आयटक संघटनेचे विविध मागण्यांसाठी आंदोलन एक रुपयाचा कडीपत्ता, सरकार झाले बेपत्ता !
- Get link
- X
- Other Apps
आयटक संघटनेचे विविध मागण्यांसाठी आंदोलन
धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) - राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कंत्राटी नर्सेस (आरबीएसके) शहरी व ग्रामीण एएनएम, जीएनएम, एलएचव्ही, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, एनएचएम अंतर्गत कार्यरत व एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रिक्त पदावर समायोजन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात येऊन त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन (आयटक) च्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.२५ ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, हे कर्मचारी गेल्या १५ वर्षापासून रात्रंदिवस आरोग्य सेवा देत आहेत. तर कोरोना महामारीच्या काळात जीव जोखमीत दिलेली आहे. परंतू या कर्मचाऱ्यांचे सेवेत समायोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यासह आरोग्य मंत्री ग्रामविकास मंत्र्यांना देखील याबाबत निवेदनाद्वारे हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांच्या कक्षात दि. २० मार्च २०२३ रोजी बैठकही झाली. त्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी नर्सेस (आरबीएसके) शहरी व ग्रामीण ग्रामीण एएनएम, जीएनएम, एलएचव्ही, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, एनयुएचएम अंतर्गत कार्यरत तसेच एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना समायोजन करण्यासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येईल. त्यांच वेतन वाढ बाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. या बैठकीत वरील संघटनेनी दिलेले ओडीसा, पंजाब, राजस्थान, मणिपूर व महाराष्ट्रातील विविध विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत शासन निर्णय देण्यात आले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील विधान सभा व विधान परीषद सदस्यांसह इतर लोकप्रतिनिधी, शासनास निवेदन सादर करून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे राज्यातील रिक्त जागेवेर समायोजन करण्याची मागणी केलेली होती. विधान सभेच्या बजेट क्षेत्रात सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर शासनाचे उत्तर म्हणून ३१ मार्च २०२३ पर्यंत समायोजन करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र ५ महिने होवून सुध्दा समायोजनाची कार्यवाही व प्रलंबित प्रश्नाबाबत कार्यवाही न झाल्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यात तीव्र असंतोष पसरलेला आहे. शासनाने समायोजनाबाबत तात्काळ सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रामविकास विभाग वित्त व नियोजन विभागासह संबंधित विभागातील मंत्री व अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेवून समायोजनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात यावा मागणीसाठी हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. यावेळी संजय देशमुख, रेखा टर्के, कविता गायकवाड, मायादेवी तिडके, अर्चना गोणे, ज्योती चव्हाण, सोनाली कुलकर्णी, डॉ. सोमेश मारावार आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
- Get link
- X
- Other Apps