मल्लिकार्जुन देवस्थान सांस्कृतिक सभागृहाचे आ चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन

मल्लिकार्जुन देवस्थान सांस्कृतिक सभागृहाचे आ चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन 

लोहारा दि.१ (प्रतिनिधी) -  तालुक्यातील अचलेर येथील मल्लिकार्जुन देवस्थान सांस्कृतिक सभागृह व इतर विविध विकास कामांचे भूमिपूजन आ ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते दि.१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. 
लोहारा तालुक्यातील अचलेर येथे आ चौगुले यांनी १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे. तर १५ व्या वित्त आयोगातून मंजुर घंटागाडीचे लोकार्पण व ३ हजार कुटुंबांना डस्टबीनचे वाटप करण्यात आले. यावेळी
सरपंच कांताबाई सोलंकर, किरण गायकवाड, जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, लोहारा तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे आदी उपस्थित होते. पर्यटन विकास योजनेतून अंतर्गत येथील मल्लिकार्जुन मंदिर परिसरात सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे ८० लाख रुपये, किचन शेड व परिसर विकास करणे - ४० लाख रुपये, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून मागासवर्गीय वस्तीत अंतर्गत रस्ते/गटारी करणे ३० लाख रुपये, लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा करणे २० लाख रुपये, तांडा वस्ती सुधार योजनेतून १० लाख रुपये असा निधी अचलेरसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आ चौगुले यांचा सत्कार केला. उमरगा लोहारा तालुक्यातील सुजाण नागरिकांनी दिलेल्या आशिर्वादामुळे सलग ३ वेळा या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आपल्या भागाला शासनाकडून जास्तीत जास्त योजना व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीत असून येणाऱ्या काळातही अचलेर तसेच मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये यापेक्षा व्यापक स्वरुपात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपतालुकाप्रमुख अनिल बायस, युवा सेना उपतालुकाप्रमुख शिवराज चिनगुंडे, शरनु मुदकान्ना, सुभाष सोळंकर, शिवसेना मुरूम शहरप्रमुख सुरेश मंगरुळे, उपतालुकाप्रमुख राजेंद्र शिंदे, अमृत वरनाळे, विधानसभा अध्यक्ष शरद पवार, तुगावचे सरपंच दीपक जोमदे, अमोल सोमवंशी, तंटामुक्त समितीचे समितीचे अध्यक्ष हरिभाऊ पुजारी, शाहूराज सोळंकर, सुरेश खंडाळकर, सिद्धू गोफणे, लखन चव्हाण, प्रदीप पुजारी, तम्मा सोनकटळे, सागर गहलोत, आनंद उपासे, ज्ञानेश्वर पुजारी, जयेश कणमुसे, राजू कारभारी, पप्पू समन, आप्पासाहेब पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !