देवळाली येथील आरोग्य शिबिरात ७७७ रुग्णांची तपासणी

देवळाली येथील आरोग्य शिबिरात ७७७ रुग्णांची तपासणी 
धाराशिव दि.२ (प्रतिनिधी) - तालुक्यातील देवळाली येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात ७७७ रुग्णांची विनामूल्य आरोग्य तपासणी व उपचार दि.२५ सप्टेंबर रोजी करण्यात आले.

 मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ७७७ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी १५९ रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. यावेळी हरी भिंगडे, आण्णा सुर्यवंशी, सलीम नाईकवाडी, प्रशांत सुर्यवंशी, विशाल आनंदे, प्रथ्वीराज देशमुख, दादा भिंगडे, सुधीर शिंदे, महेश क्षिरसागर, अविष्कार भिंगडे, पवन भालेकर, प्रतिक भिंगडे, प्रमोद शिंदे, अमोल सुर्यवंशी, अवगेरा बनसोडे, अक्षय भिंगडे, शिवाजी आनंदे, तानाजी राऊत, संजय गवळी, सुधाकर भिंगडे उपस्थित होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.नयन लोढा, डॉ. अभिषेक पगारे, डॉ.तेजस कदम, डॉ. नम्रता जयस्वाल, डॉ. जोत्सना दमाने यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निषीकांत लोकरे व आशा स्वंयसेविका यांनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !