मराठा आरक्षणाचा तात्काळ निर्णय घ्यावा - आ.‌ चौगुले

मराठा आरक्षणाचा तात्काळ निर्णय घ्यावा - आ.‌ चौगुले 

उमरगा दि.२५ (प्रतिनिधी) - मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून तात्काळ याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी आ. ज्ञानराज चौगुले यांनी माजी खा.प्रा.रविंद्र गायकवाड यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून दि.२५ ऑक्टोबर रोजी एका पत्राद्वारे केली आहे. 

 दिलेल्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, प्रामुख्याने शेती व्यवसाय करणारा मराठा समाज शेतीचे झालेले विभाजन व सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिकदृष्ट्या मागास राहिला आहे. मागील अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. यामुळे मागील काळात महाराष्ट्रात सबंध मराठा समाजाच्यावतीने आरक्षणाच्या मागणीसाठी अतिशय शांततेत लाखोंचे मोर्चेही निघाले. त्या सर्व मोर्चामध्ये आपण समन्वयाची भूमिका घेत होता हे आम्ही पाहिले आहे. मराठा समाज आपल्याकडे आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका आशेचा किरण म्हणून पाहत आहे. आपण स्वतः या विषयाकडे जातीने लक्ष ठेवून आहात आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आपली सकारात्मक भूमिका सुरुवातीपासून आहे. सध्या मराठा समाजाच्यावतीने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व गावागावाने साखळी आमरण उपोषण करण्यात येत आहे. समाजाच्या भावना तीव्र होत चालल्या असून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय तात्काळ घेण्यात यावा. तसेच मराठा समाजाला तात्काळ सर्व स्तरावर टिकेल असे आरक्षण देऊन महाराष्ट्रात सुरू असलेल्या सर्व विभागातील नोकर भरतीमध्ये सामावून घ्यावे. तोपर्यंत नोकर भरती थांबवावी. तसेच  सारथी संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ जास्तीत जास्त मराठा समाजातील मुलांना मिळवून द्यावा. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील जाचक अटी रद्द करून मराठा समाजातील लाखो तरुण व तरुणींना उद्योग किंवा व्यवसायासाठी तात्काळ व सुलभ कर्ज उपलब्ध करून द्यावे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा मुला-मुलींना स्वतंत्र वस्तीगृह उपलब्ध करून द्यावेत आदी त्यांनी केल्या आहेत.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !