तरुणांनी नोकऱ्यांच्या मागे न लागता उद्योजक व्हावे - डांगे
- Get link
- X
- Other Apps
तरुणांनी नोकऱ्यांच्या मागे न लागता उद्योजक व्हावे - डांगे
धाराशिव दि.१४ (प्रतिनिधी) - आपल्या परिसरात उद्योगनिर्मितीला मोठ्या प्रमाणात वाव असून तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करावा. या व्यवसाय निर्मितीमधून आपला व परिणामी देशाचा विकास करावा असे आवाहन शेषाद्री डांगे यांनी केले. धाराशिव शहरातील व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयात आयोजित उद्योजकता कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेचे अनिल व्यास, शशिकांत गव्हाणे, कमलाकर पाटील, रोटरी क्लबच्या अध्यक्ष प्रा.डॉ.अनार साळुंके, सचिव डॉ.मीना जिंतुरकर, रोटरीचे रणजीत रणदिवे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.प्रशांत चौधरी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डांगे म्हणाले की, आज वेगवेगळ्या क्षेत्रात नवनवीन व्यवसाय करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. त्याचा फायदा आजच्या तरुणांनी घेतला पाहिजे असे त्यांनी सांगितले. तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अधिकारी दिलीप गाढे यांनी नवीन उद्योग निर्माण करताना बँकेची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. तर बचतीचे महत्व, वित्त पुरवठा याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक नरसिंह जावळीकर यांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत छोट्या उद्योगांना कशी मदत केली जाते ? या बाबत माहिती दिली. प्रास्ताविकात प्रा.डॉ.प्रशांत चौधरी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी यशस्वी उद्योजक होऊन समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला पाहिजे असे त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी कमलाकर पाटील, शशिकांत गव्हाणे, मीना जिंतुरकर, अनिल व्यास यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.कृष्णा तेरकर व प्रा.प्रशांत गुरव यांनी तर आभार प्रा.अभय शिंदे यांनी मानले. या कार्याक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps