भारत जोडो अभियानचे २२ राज्यांमध्ये काम सुरु - बाबर
भारत जोडो अभियानचे २२ राज्यांमध्ये काम सुरु - बाबर
धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) - एकीकडे देशात सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षासारखे जातीयवादी जाती जातीमध्ये द्वेष पसरून राजकारण करून त्यांच्यातील एकी तोडण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांचा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी भारत जोडो अभियानच्या माध्यमातून २२ राज्यात सुरू असल्याची माहिती राज्याध्यक्ष ललीत बाबर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.११ ऑक्टोबर रोजी दिली.
धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भारत जोडो अभियानचे प्रा. अर्जुन जाधव, मराठवाडा मुक्ती अभियानचे सुरेश शेळके, सुभाष घोडके आदी उपस्थित होते. पुढे बोलताना बाबर म्हणाले की, भारत जोडो अभियानच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तर दि
१ व २ जुलै रोजी जळगाव येथे भारत जोडो अभियानचे संमेलन घेतले असून या संमेलनामध्ये रोजगार, शेतकरी व वंचित घटक याबाबत चर्चा करण्यात आली. भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना झाली असून या आघाडीतील उमेदवारांना सहकार्य करुन भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्याची मानसिकता तयार करण्याचे प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघात सोशल मीडियाची फळी निर्माण केली असून ही जबाबदारी नंदू मोटे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेल्या रोजगार, समाज निहाय आरक्षण, जाहीरनाम्याची पूर्तता का केली नाही ? आदींसह विविध सामाजिक मुद्द्यांवर जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी प्रत्येक विभागात ५० कार्यकर्त्यांना प्रशिक्षक दिले जात आहे. तसेच राज्यातील ५ ते ६ विधानसभेच्या जागा आमच्या आघाडीचे उमेदवार लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.