धाराशिव येथे होणाऱ्या ६५ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मैदानाचा भूमीपूजन सोहळा विजेत्यांना दोन कोटींची बक्षिसे - पाटील
धाराशिव येथे होणाऱ्या ६५ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मैदानाचा भूमीपूजन सोहळा
विजेत्यांना दोन कोटींची बक्षिसे - पाटील
धाराशिव दि.२३ (प्रतिनिधी) - १६ ते २० नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र केसरी २०२३ धाराशिव येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी मैदानाचे भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान १८ नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ व उपमुख्यमंत्री अजित पवार तर दि.२० नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार असल्याची माहिती या स्पर्धेचे आयोजक सुधीर पाटील यांनी दिली.
धाराशिव येथील तुळजाभवानी जिल्ह स्टेडियम संकुल कुस्ती मैदानाचे पुजन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजक सुधीर पाटील, अर्जुन वीर काकासाहेब पवार, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, राहुल शेवाळे, राहुल काळभोर, रुस्तैम ए हिंद अमोल बुचडे, हिंद केसरी अमोल भराटे, महाराष्ट्र केसरी विकी बनकर, ऍड अनिल काळे, संजय पाटील दुधगावकर, चंद्रकांत निमगिरे,रावसाहेब मगर, भारत मेकाले, ललित लांडगे, बंडू गोचडे, राहुल आवारे,
बाळासाहेब पडघम, मारुती विठ्ठलकर वामनराव गाते, शरद पवार, दाणे वस्ताद, गणेश डांबरे, संतोष नलावडे, अजय गडदे, धनराज भुजबळ, खोबरे गुरुजी, सुर्यकांत टेकाळे, नवनाथ जगताप आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.