वरवंटी येथील डोंगरात हिंस्र प्राण्याने पाडला वासराचा फडशा परिसरातील पशु पालकांमध्ये दहशतीचे वातावरण

वरवंटी येथील डोंगरात हिंस्र प्राण्याने पाडला वासराचा  फडशा

परिसरातील पशु पालकांमध्ये दहशतीचे वातावरण

धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) - तालुक्यातील वरवंटी परिसरात असलेल्या डोंगर भागात हिंस्र प्राण्याने धुमाकूळ घातला असून त्याने एका वासराचा दि.३० सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास फडशा पाडला आहे. त्यामुळे वरवंटीसह वडगाव (सि), बावी, अपसिंगा, कामठा परिसरातील नागरिकांसह पशुपालकामध्ये प्रचंड दहशत व भीतीचे वातावरण पसरले आहे.
धाराशिव तालुक्यातील वरवंटी परिसरातील डोंगरावर वाघ सदृश्य प्राण्याचा वावर वाढला असून परिसरातील पशुंची शिकार करण्याचे प्रमाण वाढले आहे. या हिंस्र प्राण्याने वरवंटी येथील एका वासराचा एका रात्रीत फडशा पाडला आहे. तर दुसऱ्या दिवशी दि.१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्याने एका गायीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सल्लाउद्दीन शेख हे पशुपालक शेतकरी शेतात असल्यामुळे त्यांनी लागलीच आरडाओरड करीत दगडे मारीत इतर नागरीकांना बोलावल्यामुळे त्याने तेथून पळ काढत धूम ठोकली. या परिसरात वाघ सदृश्य प्राणी असल्यामुळे पशुपालक व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती व दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ या हिंस्र प्राण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील पशुपालक, शेतकरी व नागरिकांमधून होऊ लागली आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !