परंडा शहरातील स्वच्छता करण्याची शिवसेना ( ठाकरे) ची मागणी
परंडा शहरातील स्वच्छता करण्याची शिवसेना ( ठाकरे) ची मागणी
परंडा दि.६ (प्रतिनिधी) - शहरातील स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी शिवसेना (ठाकरे) च्यावतीने एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, आगरकर गल्लीतील व शहरातील बोअरवेल चालू करावेत तसेच शहरातील स्वच्छता करावी. शहरात डेंग्यू, मलेरिया सारखे आजार वाढत आहेत. त्यामुळे येत्या १० दिवसांत हे प्रश्न मार्गी लावावेत. अन्यथा शिवसेन स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. या निवेदनावर शहर प्रमुख रईस मुजावर, माजी नगरसेवक मकरंद जोशी, डॉ.अब्बास मुजावर, बाजार समिती संचालक ऍड. अनिकेत काशीद, युवा सेनेचे शहर प्रमुख कुणाल जाधव, सचिन शिंदे, राजा पाटील, आण्णा लोकरे, पंकज नांगरे, अशोक चव्हाण, राहुल काशीद, हनुमन जाधव, योगेशे मरळे, आकाश काशीद, ओंकार काशीद, सलीम हन्नुरे, प्रकाश काशीद, राहुल आगरकर, रंजना काशीद, कविता काशीद, जमुना काशीद, सुरेश काशीद, महादेव शिंदे, नागेश काशीद, हनुमंत हातुळकर आदींच्या सह्या आहेत.